फिल्म रिव्ह्यू: आयुष्यमानच्या खांद्यावर 'हवाईजादा'ची धुरा

विभु पुरी दिग्दर्शित आयुष्यमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा आणि नमन जैन अभिनित 'हवाईजादा' आज रिलीज झालाय.

Updated: Jan 30, 2015, 08:14 PM IST
फिल्म रिव्ह्यू: आयुष्यमानच्या खांद्यावर 'हवाईजादा'ची धुरा title=

मुंबई: विभु पुरी दिग्दर्शित आयुष्यमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा आणि नमन जैन अभिनित 'हवाईजादा' आज रिलीज झालाय.

स्क्रीन प्लेः विभु पुरी, सौरभ भावे 
ड्यूरेशनः २ तास ३३ मिनिट 
रेटिंगः दोन स्टार

१८९० चा काळ रेखाटण्य़ाचा प्रयत्न या सिनेमाच्या माधयमातून करण्यात आलाय. शिवकर बापुजी तळपदे हे भारतीय वैज्ञानिक ज्यांच्या बद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी राईट्स बंधूंच्याही आधी विमानाचा शोध लावला.अशा या मराठी वैज्ञानिकावर आधारित या सिनेमाची कथा फिरते. या सिनेमाचा फर्स्ट हाल्फ शिवकर तळपदे आणि त्यांची प्रियसी सितारा यांच्या प्रेम कहाणीवरच सिनेमा संपतो.

'हवाईजादा' हा आयुषमान खुराणाचा हा एक 'वन मॅन शो' सिनेमा आहे. त्यानं साकारलेला शिवकर तळपदे अर्ध्याहून जास्त 'कोई मिल गया' मधील हृतिक रोशननं निभावलेल्या भूमिकेशी प्रेरीत वाटतो.

अभिनेत्री पल्लवीनं साकारलेली डान्सर सितारा देवीही प्रेक्षकांच्या  एक्स्पेक्टेशन्स पूर्ण करण्यात यशस्वी होईल  का, या बाबत शंकाच वाटते. तिनं एका मराठी आयटम नंबरवर परफॉर्मही केलाय, पण तो हवा तितका अपिलिंग वाटत नाही.

सिनेमाचा खरा  प्लस पॉईंट आहे या सिनेमाचा सेट आणि सिनेमाटोग्राफी. हवाईजादाचा सेट पाहिल्यानंतर कुठतरी सावरिया या सिनेमाची आठवण येते.

 सिनेमाचं दिगदर्शन केलंय विभु पुरी यांनी... सिनेमाचा प्रोमो रिलिज झाल्यानंतर कुठेतरी सिनेमाचा ओव्हरऑल लूक पाहता एक वेगळाच बझ क्रिएट करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात परिस्थिती काही औरच आहे.  सिनेमा नको तितक्या गाण्यांनी  लांबवण्यात आलाय. एक विंटेज सिनेमा पाहणं कधीही एक ट्रीट असते. पण हवाईजादा पाहताना केवळ निराशाच हाती येते.. विभु पुरी या सिनेमाला योग्य ती ट्रीटमेंट देण्यात खरं तर मागे पडलाय. 

 सिनेमाला फ्लो नाही, स्पीडही नाही यामुळं चित्रपटगृहातले तीस तास कधी संपतात असं वाटतं. या सगळ्या गोष्टींमुळे हवाईजादा एक complete failure ठरतो. आमच्याकडून सिनेमाला दोन स्टार. 
 
 जयंती वाघधरे, प्रतिनिधी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.