हेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार

मुंबईत घर असावे असे स्वप्न सामान्य माणसाप्रमाणेच अनेक तारे तारकाही उराशी बाळगून असतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे आज  ९७२ घरांची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

Updated: Aug 10, 2016, 02:02 PM IST
हेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार title=

मुंबई : मुंबईत घर असावे असे स्वप्न सामान्य माणसाप्रमाणेच अनेक तारे तारकाही उराशी बाळगून असतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे आज  ९७२ घरांची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
 
रंगभूमीवरील अजरामर कलाकृती असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’ नाटकात सध्या हेमांगी प्रमुख भूमिका साकारत आहे. म्हाडाच्या घरासाठी हा तिचा आठवा प्रयत्न होता. तिला मागाठाणे, बोरीवली येथे घर लागले आहे. हेमांगीसोबतच अभिनेत्री सुहास परांजपे यांनाही मागाठाणे येथे घर लागले आहे.
 
एकूण  १ लाख  ३६ हजार ५७७ जणांनी या घरांसाठी अर्ज दाखल केले होते मात्र यातील फक्त ९७२  जणांनाच घर मिळाले आहे. आज सकाळी ९ वाजता रंगशारदा सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. यात सैराट चित्रपटात सुमन अक्काची भूमिका साकारणाऱ्या छाया कदम यांनाही प्रतिक्षानगर, सायन येथे घर लागले.
 
हेमांगी आणि सुहासला घर लागल्याने इतर कलाकारांनाही आशा होती. तारक मेहता का उल्टा चष्मामधील मिस्टर अय्यर म्हणजेच तनुज महाशब्दे तसेच श्रुती मराठे, सीमा बिस्वास इत्यादी कलाकारांनीही घरासाठी अर्ज केला होता.