पाच वर्षांच्या चिमुरड्याचे हनुमान चालिसा ऐकून हिमेश रेशमियाने दिला मोठा चान्स

 पाच वर्षाच्या मुलाने गायलेले हनुमान चालिसा ऐकून संगीतकार-गायक-अभिनेता हिमेश रेशमिया इतका प्रभावित झाला की त्याने लगेच त्याला एका गाण्यासाठी साइन केले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 24, 2017, 11:26 PM IST
पाच वर्षांच्या चिमुरड्याचे हनुमान चालिसा ऐकून हिमेश रेशमियाने दिला मोठा चान्स  title=

 मुंबई :  पाच वर्षाच्या मुलाने गायलेले हनुमान चालिसा ऐकून संगीतकार-गायक-अभिनेता हिमेश रेशमिया इतका प्रभावित झाला की त्याने लगेच त्याला एका गाण्यासाठी साइन केले. 
 
 लहान मुलांच्या गाण्याचा रिअॅलिटी शो 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स सीझन ६ मध्ये हिमेश रेशमिया जज म्हणून आहे. त्यावेळी एका विशेष गीतासाठी त्याने ५ वर्षाच्या जयश कुमारला ऐकले. या मुलाने मंचावर हनुमान चालिसा  म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 
 
 हिमेशने एका मुलाखतीत सांगितले की मला या मुलाच्या क्षमतेची जाणीव आहे. जयशच्या प्रतिभेला एका योग्य पद्धतीने पुढे नेले आणि त्याला योग्य दिशा दाखवली तर कल्पना करू शकत नाही की तो किती यश मिळवेल. 
 

 

Jayash Kumar - this lil champ from saregamapa has divine energy , thanks for making it the Num 1 music show across all channels - cheers @zeetv #saregamapalilchamps #amulsaregamapalilchamps #zeetv #jayashkumar #realhimesh #himeshreshammiya #champ

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

 जयशच्या तोंडून हनुमान चालिसा ऐकून असे वाटले की तो भविष्यातील मोठा गायक आहे. शोमध्ये उपस्थित असलेली जयशची आई म्हणाली की त्याने कोणतेही गाणे तीन चार वेळा ऐकले तर त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्याला ते तोंडपाठ होते. 
 
जयशच्या असाधारण प्रतिभेमुळे हिमेशने त्याला एका विशेष गाण्यासाठी साईन केले आहे.