'जुली-२'चे हॉट पोस्टर रिलीज; या अभिनेत्रीचा हॉट अंदाज

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेस नेहा धुपियाच्या बोल्ड अभिनयाने बॉक्स ऑफिसवर हंगामा गाजवणाऱ्या 'जुली' या फिल्मचा सिक्वल येणार आहे.

Updated: Feb 17, 2016, 04:12 PM IST
'जुली-२'चे हॉट पोस्टर रिलीज; या अभिनेत्रीचा हॉट अंदाज title=

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेस नेहा धुपियाच्या बोल्ड अभिनयाने बॉक्स ऑफिसवर हंगामा गाजवणाऱ्या 'जुली' या फिल्मचा सिक्वल येणार आहे. 'जुली-२' या चित्रपटाच्या माध्यमातून दक्षिण भारतातील अभिनेत्री राय लक्ष्मी आपले जलवे दाखवणार आहे. तेही  बोल्ड अंदाजात.

राय लक्ष्मी हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. ती या पोस्टरमध्ये बोल्ड दिसतेय. या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारी राय लक्ष्मी यापूर्वी तामीळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात झळकली आहे.

२००५ साली तामीळ सिनेमातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. २०११ मध्ये 'मनकथा' या चित्रपटासाठी तिला बेस्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कारही मिळाला होता.