मुंबईः नेस वाडियाच्या विरोधात अभिनेत्री प्रिती झिंटाने तक्रार केली होती. त्याप्रकरणी प्रितीने आपला जबाब नोंदविलाय. मात्र तिने रवि पुजारीला ओळखण्यास नकार दिलाय.
अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीने या प्रकरणावरुन नेसच्या वडिलांना धमकी दिली होती.
'मी रवि शास्त्री आणि चेतेश्वर पुजाराला ओळखते आणि यांच्याशिवाय कोणा दुसऱ्यांला ओळखत नाही, असं प्रितीने जबाबात सांगितलेय.'
खूप वेळ चाललेल्या चौकशीत प्रिती मीडियासमोर काही बोलली नाही. प्रिती सरळ वानखेडे स्टेडियमवर गेली आणि पोलिसांकडे जबाब नोंदविला.
प्रितीने तक्रारीत म्हटलं की, 30 मे रोजी नेसने माझ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले. नेस माझ्या सीटजवळ आला आणि सगळ्यासमोर त्यांने ओरडून शिव्या देऊ लागला.
तिच्या मते,'नेस बसण्याच्या जागेवरुन वाद घालत होता. त्याचमुळे त्याने चुकीचे शब्द वापरले.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.