'स्टेरॉयडस्'ची सवय सोडण्यासाठी हनी सिंह रिहॅब सेंटरमध्ये?

गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांपासून आणि वादापासूनही दूर असलेल्या रॅपर यो यो हनी सिंह याच्याबद्दल जसबीर जस्सी या पंजाबी गायकानं एक मोठा खुलासा केलाय. 

Updated: Aug 27, 2015, 02:36 PM IST
'स्टेरॉयडस्'ची सवय सोडण्यासाठी हनी सिंह रिहॅब सेंटरमध्ये? title=

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांपासून आणि वादापासूनही दूर असलेल्या रॅपर यो यो हनी सिंह याच्याबद्दल जसबीर जस्सी या पंजाबी गायकानं एक मोठा खुलासा केलाय. 

जसबीर यांच्या म्हणण्यानुसार, यो यो हनी सिंगशी त्यांची गाठ नुकतीच एका रिहॅबिलेटेशन सेंटरमध्ये पडली होती. त्यामुळे, ड्रग्स घेण्याची हनी सिंहला सवय आणि ही सवय सोडण्यासाठी चंदीगडच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु असल्याच्या बातम्यांना बळ मिळतंय. 

काही लोकांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या गंभीर आजारामुळेही हनी सिंह पीडित आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून हनी सिंग सार्वजनिक ठिकाणी दिसलेला नाहीय.   

पण, जसबीर यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या हनी सिंह खूप कठिण काळातून जातोय. केवळ स्टेजवरच नाही तर त्याच्या खाजगी आयुष्यातही तो एनर्जीनं भरलेला होता. पण, भेटला तेव्हा मात्र तो खूपच त्रस्त दिसत होता'.

नेमकं काय झालंय हनी सिंहला असं जेव्ह जसबीर यांना विचारण्यात आलं तेव्हा 'तेच स्टेरॉयडस् वगैरे... तो खूप आजारी दिसत होता. मी जेव्हा त्याला रिहॅब सेंटरमध्ये भेटलो तेव्हा मला खूप दु:ख झालं होतं. तो खूपच विचित्र वागत होता. पण, त्याची रिकव्हरी चांगल्या पद्धतीनं होत असल्याचं तिथल्या मॅनेजरनं म्हटलंय' असा खुलासा जसबीर यांनी केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.