'सुल्तान' सिनेमात एक नट आणि दोन नट्या

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान येणाऱ्या 'सुल्तान' या सिनेमात दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे. 

Updated: Jul 29, 2015, 02:16 PM IST
'सुल्तान' सिनेमात एक नट आणि दोन नट्या title=

मुंबई : बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान येणाऱ्या 'सुल्तान' या सिनेमात दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार आहे. 

सलमान खान यशराज बॅनर खाली येणारा सिनेमा सुल्तानमध्ये काम करणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदमध्ये रिलीज होणार आहे.

सिनेमासाठी फक्त सलमान खानची कास्टिंग झाली आहे. सलमान एक बॉक्सरचा रोल या सिनेमात करणार आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफर सध्या पंजाब आणि अन्यत्र लोकशेन पाहात आहेत, मात्र सिनेमात इतर कास्टिंग सलमानने स्पष्ट केलं आहे. 

ही खेळावर आधारीत प्रेमकथा असणार आहे, यात दोन नट्या असणार आहेत, यात एक ओळखीचा चेहरा असेल, तर नवीन चेहरा असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.