नवी दिल्ली : देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत. यात साहित्यिक, कलाकार, संशोधक, लेखक यांचा समावेश होता. आता अभिनेता आमिर खानची भर पडली. वाढती असहिष्णूता आणि देश सोडण्याचा विचार यावर अभिनेता आमीर खानने केलेल्या वक्तव्यावरून त्याच्यावर सर्वबाजूंनी टीका होऊ लागली आहे. तर नेटिझन्सने कडवट टीका केलेय.
अधिक वाचा : आमिरची पत्नी तालिबानात राहणार आहे का?, भाजपचे नेते साक्षी भडकलेत
बॉलिवूडमधील काही कलाकारांसोबतच नेटिझन्सनीही त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्यासंदर्भातील आमिरने केलेल्या विधानाचे बॉलिवूडमध्येही पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री रवीना टंडन यांनी आमिर याच्या या विधानाचा जोरदार हरकत घेतलेय.
कोठे येऊ सोडायला आमिर!
कुठे आणि कधी जातोय ते सांग, म्हणजे आम्ही सोडायला येऊ. जमले तर त्या देशात, नाही तर किमान विमानतळापर्यंत तर नक्कीच येऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि मला त्याबाबत फार काळजी वाटते. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अतिशय चिंतेत असलेली माझी पत्नी किरणने तर मला आपण देश सोडून जाऊ या, असेही सांगितले होते, असे आमिर दिल्लीतील एका कार्यक्रमात म्हटले. त्यानंतर टीका होऊ लागली आहे. अभिनेत्री रवीना टंडने आमिरच्या वक्तव्यावर तिखट हल्ला चढविला आहे.
रवीना टंडनने टोचले कान
मोदी हे पंतप्रधान होऊ नयेत, असे ज्यांना वाटत होते, त्यांची आता हे सरकार पडावे, अशी इच्छा आहे. मात्र, राजकारण करुन ते या देशाची लाज घालवत आहेत. देशामधील हिंसाचारास कारणीभूत असणारे विविध घटक हे कायमच सक्रिय होते; आणि अशा गटांचा निषेधच नोंदवावयास हवा. मात्र त्यावरुन संपूर्ण देशात असहिष्णुता असल्याचा देखावा निर्माण करणे योग्य नाही, असे रवीना टंडन म्हणाली.
पळ काय काढतोस - ऋषी कपूर
जेव्हा काही दुर्घटना घडतात वा व्यवस्थेमध्ये सुधारणेची गरज असते, तेव्हा त्यामध्ये सुधारणा घडविणे हे खऱ्या नायकाचे कार्य असते. परिस्थितीपासून पळ कढाणे नव्हे, हे या खान जोडप्याने ध्यानी घेणे आवश्यक आहे, असे ऋषी कपूर यांनी म्हटलेय.
अधिक सहिष्णू देश - रामगोपाल
तर जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये भारत हा अधिक सहिष्णू देश आहे. आणि काही लोक जर या देशात समाधानी नसतील; तर ते कुठल्या देशात जाणार आहेत, हेदेखील त्यांनी सांगावे, असे रामगोपाल वर्मा यांनी म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.