मुंबई : डिस्ने जंगल बुकची चित्तथरारक कहाणी मोठ्या पडद्यावर लवकरच घेऊन येत आहे. जंगल बुकचा ऑफिशियल प्रोमो अतिशय चित्तथरारक झाला आहे. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
मोगली तुम्हाला आणखी नव्या स्वरूपात दिसणार आहे. मोगली तुमच्या लहाणपणी तुमचा हिरो होता, आता तुमच्या मुलांच्या तोंडीही मोगलीचं नाव येणार आहे.
नोबेल पुरस्कार विजेता इंग्रजी लेखल रूडयार्ड किपलिंग यांचा जंगल बुक हा कहाणींचा एक संग्रह आहे. किपलिंग यांच्या जंगल बुकच्या हा गोष्टींचा संग्रह पहिल्यांदा १८९३-९४ मध्ये पहिल्यांदा मासिकांमध्ये छापून आला. या पुस्तकातील मुळ कहाणीसोबत छापून आलेले चित्र हे रूडयार्ड किपलिंग यांचे वडिल जॉन लाकवूड किपलिंग यांनी बनवले होते.
जंगल बुकचे लेखक किपलिंग यांचा जन्म भारतात झाला होता. ते पुन्हा दहा वर्ष लंडनमध्ये गेले भारतात आल्यानंतर साडेसहा वर्ष त्यांनी जंगल बुकच्या कहाण्या कागदावर शब्दाच्या स्वरूपात रंगवल्या. जंगल बुकमधील पात्र आहे, मोगली. हा लहान मुलगा जंगलात हरवतो आणि त्याचं पालन पोषण जंगलातील प्राणी करतात, या मानवी पुत्राचा जंगलात जगण्याचा संघर्ष जंगल बुकमध्ये आहे.