मुंबई: कपिल शर्माला प्रियंका चोप्राचा इतका राग आला की, त्यानं आपला इअर फोन आणि माइक फेकून दिला. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्री प्रियंका चोप्राबद्दलचा राग त्यानं आता सोशल मीडियावर बोलून दाखवलाय.
त्यानं ट्वीट केलं होतं की,'प्रियंका खूप वाईट आहे, एका सोहळ्यादरम्यान आपलं भांडण झालं होतं हे मला आत्ता टि.व्ही. वर बघितल्यावर समजलं. ह्यावर प्रियंकानं असे उत्तर दिलं की, 'अशा खोट्या गोष्टींवर लक्ष्य नको देऊ.'
मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार एका पूरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन कपिल आणि प्रियंका हे एकत्र करणार होते. कपिल प्रियंकाची वाट बघत असताना प्रियंका मेकअप रूममधून तीन तासांनी बाहेर आली. तरीही ती तयार नाही असं बोलल्यामुळं कपिल रागानं माईक आणि इअरफोन आपटून निघून गेला आणि जाता जाता बोलूनही गेला की, 'बायकांचा हाच त्रास आहे, मॅडम अजून तयार नाही'. असं म्हटलं जातं की, कपिल शर्माचा हा पंच पण असेल ज्यासाठी तो ओऴखला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.