...जेव्हा बेगम करीना अजयवर वैतागते!

सिंघम 2 मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत काम करताना अभिनेत्री करीना कपूर खूप अडचणी आल्या... हे खुद्द करीनानंच सांगितलंय. काही काही वेळा तर अजयच्या बाजुलादेखील बसणं कठिण होत होतं... असंही करीनानं म्हटलंय. 

Updated: Jul 31, 2014, 04:39 PM IST
...जेव्हा बेगम करीना अजयवर वैतागते! title=

मुंबई : सिंघम 2 मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत काम करताना अभिनेत्री करीना कपूर खूप अडचणी आल्या... हे खुद्द करीनानंच सांगितलंय. काही काही वेळा तर अजयच्या बाजुलादेखील बसणं कठिण होत होतं... असंही करीनानं म्हटलंय. 

पत्रकारांशी बोलताना करीनानं आपल्याला अजयसोबत काम करताना आलेल्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला... अजय खूप सिगारेट पितो... त्यामुळे त्याच्या बाजुला बसणंदेखील कठिण होऊन जातं... शूटिंगदरम्यान तर तो धूर सोडतचं असतो... त्याच्यासोबत एका रुममध्ये उभं राहणंही कठिण गोष्ट आहे. अनेकदा आम्ही जेवायला बसलेलो असतो आणि अजय अचानाक सिगारेट काढून फुकायला लागतो... असं करीनानं म्हटलंय. 
 
‘त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही एकत्र बसून जेवणार नाही कारण मी सिगारेटच्या धुरासोबत बसूच शकत नाही’ असंही करीनानं स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.