कोणामुळे झाला रणबीर-कतरिनाचा ब्रेक अप ?

रणबीर आणि कतरिना यांच्यामधल्या ब्रेक अपला नक्की कोण जबाबदार आहे याबाबत सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. 

Updated: Feb 14, 2016, 06:00 PM IST
कोणामुळे झाला रणबीर-कतरिनाचा ब्रेक अप ?

मुंबई: रणबीर आणि कतरिना यांच्यामधल्या ब्रेक अपला नक्की कोण जबाबदार आहे याबाबत सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. पण आपल्या ब्रेक अपला दीपिका पदुकोण जबाबदार असल्याचं कतरिनाला वाटत असल्याचं बोललं जातंय. 

तमाशा चित्रपटाचं शूट आणि प्रोमोशनवेळीच कतरिना आणि रणबीरचा ब्रेक अप झाला, त्यामुळे कतरिना यासगळ्याला दीपिकाला जबाबदार धरल्याची माहिती मिळतेय.

कतरिना आणि दीपिकामधली भांडणं एवढी टोकाला गेली आहेत, की कतरिनाच्या प्रेस कॉन्फरंसमध्ये दीपिकाबद्दल प्रश्न विचारू नका, असं कतरिनाच्या पीआरकडून पत्रकारांना सांगण्यात येत आहे.