मनोज कुमार यांची प्रकृती खालावली

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांची तब्येत खालावल्याने त्यांना कोकिळाबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

Updated: Dec 3, 2015, 09:14 AM IST
मनोज कुमार यांची प्रकृती खालावली title=

मुंबई : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांची तब्येत खालावल्याने त्यांना कोकिळाबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

मनोज कुमार यांचे टोपण नाव भारत कुमार असून फक्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मनोज कुमार यांनी निर्माता,दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. हरियाली और रास्ता, पूरब और पश्चिम, क्रांती, वो कोन थी, शहिद, रोटी कपडा और मकान हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.