कान्समध्ये झळकली मराठी अभिनेत्री अमृता सुभाष

मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला यंदाच्या कान्समध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. निमित्त होतं अनुराग कश्यप दिग्दर्शित रामन राघव 2.0 या सिनेमाचं. या सिनेमामध्ये अमृतानं भूमिका केली आहे. या सिनेमाचा प्रीमिअर कान्समध्ये दिमाखात पार पडला. यावेळी रेड कलरच्या गाऊनमध्ये मराठमोळ्या अमृताचा हॉट अंदाज बघायला मिळाला. 

Updated: May 18, 2016, 11:11 PM IST
कान्समध्ये झळकली मराठी अभिनेत्री अमृता सुभाष title=

मुंबई : मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला यंदाच्या कान्समध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. निमित्त होतं अनुराग कश्यप दिग्दर्शित रामन राघव 2.0 या सिनेमाचं. या सिनेमामध्ये अमृतानं भूमिका केली आहे. या सिनेमाचा प्रीमिअर कान्समध्ये दिमाखात पार पडला. यावेळी रेड कलरच्या गाऊनमध्ये मराठमोळ्या अमृताचा हॉट अंदाज बघायला मिळाला. 

उर्वशी जुनैजाने अमृताचा हा हॉट ड्रेस डिझाईन केला होता. तर दुसरीकडे शेफॉनसाडीमध्ये भारतीय परंपरेला साजेशा लूकमध्ये अमृताने सगळ्यांचे लक्ष वेधलं. या नेटच्या साडीवर पदरावर हत्तींची डिझाईन असल्यामुळे अमृताचा लूक अधिकच आकर्षक दिसत होता. मसाबाने अमृताची ही खास साडी डिझाईन केली होती. 

सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत असून रामन राघव या सायको किलरवर हा सिनेमा आधारित आहे. स्मिता पाटीलनंतर तब्बल ४० वर्षांनी एखादी मराठमोळी अभिनेत्री कान्समध्ये उपस्थित होती. त्यामुळे ही तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.