प्रेक्षकांच्या घामांच्या धारांत कोमेजली 'ती फुलराणी'!

कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडलं. 

Updated: Apr 15, 2016, 09:02 AM IST
प्रेक्षकांच्या घामांच्या धारांत कोमेजली 'ती फुलराणी'! title=

कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडलं. 

नाट्यगृहातले एसी मध्यंतरापर्यंत सुरू नव्हते. त्यामुळं संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी मध्यंतरानंतर नाटकाचा प्रयोग बंद पाडला. 'ती फुलराणी' या नाटकावेळी हा प्रकार घडला.

'एसी बंद तर नाटक बंद'

'ती फुलराणी' हे नाटक पाहण्यासाठी आलेल्या नाट्यरसिकांबरोबर नाट्य कलाकारांनाही घामाच्या धारांचा सामना करावा लागला. नाटकाचा पहिला अंक उकाडय़ात पाहणाऱ्या नाटय़ रसिकांनी नाटकाचा मध्यंतर होताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

एसी सुरु नसेल तर आमचे पैसे परत द्या आणि पैसे परत केल्याशिवाय पुन्हा सुरु करु नका, अशी मागणी संतप्त रसिकांनी केली. या मागणीसाठी प्रेक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळं नाटकाचा मध्यंतर तब्बल एक तासाचा झाला. तासाभराच्या गोंधळानंतर नाटकाचा दुसरा अंक पुन्हा सुरु झाला.