फिल्म रिव्ह्यूः पोश्टर बॉइजचं हसविणारं विनोदी त्रिकूट

 दिग्दर्शक श्रेयस तळपदेचा धमाल विनोद चित्रपट पोश्टर बॉइज प्रेक्षकांना हसविण्यात यशस्वी ठरणार हा काही श्रेयसचा विश्वास काही अर्थी सार्थ होताना दिसत आहे. 

Updated: Aug 1, 2014, 09:32 PM IST
 फिल्म रिव्ह्यूः पोश्टर बॉइजचं हसविणारं विनोदी त्रिकूट title=

जयंती वाघधरे, मुंबई :  दिग्दर्शक श्रेयस तळपदेचा धमाल विनोद चित्रपट पोश्टर बॉइज प्रेक्षकांना हसविण्यात यशस्वी ठरणार हा काही श्रेयसचा विश्वास काही अर्थी सार्थ होताना दिसत आहे. 

कथा:
तीन अवलियांची धमाल गोष्ट सांगणारा सिनेमा म्हणजे पोश्टर बॉईज.. गावातला मास्तर, जगन देशमुख आणि अर्जुन जगताप या तिघांचे फोटो एके दिवशी अचानकपणे नसबंदीच्या जाहिरातवर झळकतात. विशेष म्हणजे त्यांची या तिघांना जराही कल्पना नसते. ते जाहिरातीचं पोस्टर गावभर लागल्य़ानंतर जी काही धमाल उडते त्यावर पोश्टर बॉईज हा सिनेमा बेतला आहे. नसबंदीच्या जाहिरातीवर या त्रिकूटाचे फोटो आल्यावर या तिघांचं जग कसं बदलतं. समाजात असलेली आपली पूर्वीची प्रतिमा पुन्हा मिळवण्यासाठी ते कशी  धडप़ड करतात. त्यांच्या या धडपडीत काय काय घडतं ..त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं...हे या सिनेमात अत्यंत रंजकपणे मांडण्यात आलं आहे. अत्यंत मनोरंजक कथा आणि त्याला  दिलीप प्रभावळकरांसरख्या कसलेल्या अभिनेत्याची साथ म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. दिलीप प्रभावळकरांच्या साथिला आहेत ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव ... या त्रिकूटाने पोश्टर बॉइजमध्ये धमाल केली आहे...


 

अभिनय:

दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या तिघांचा हा सिनेमा आहे.. दिलीप प्रभावळकर यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा पोश्टर बाईजमधली त्यांची भूमिका जरा हटके अशीच म्हणावी लागेल. जगन देशमुख नावाच्या वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका यात त्यांनी साकारली आहे.. नेहमी प्रमाणे दिलीप प्रभावळकर त्यांच्या अभिनयाची जादू या सिनेमातही पहायला मिळाली.... त्यांचा अभिनय, त्यांची संवादफेकीची शैली, त्यांचं बिटवीन द लाइन्सचं टाय़मिंग हे सगळं काही जमून आलं आहे...आणि ते प़डद्यावरही जाणवतं...

ऋषिकेश जोशीने गावातला मास्तरची भूमिका केली आहे...त्याने आजवर साकारलेल्या विविध  भूमिकेच्या तुलनेत  हा त्याचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स म्हटलं तर वावग ठरणार नाही.....एका खास  शैलीत बोलणारा हा मास्तर, त्याचा लूक, त्याच्या वाट्याला आलेला प्रत्येक सीन त्यानं पूर्ण डेडिकेशननं निभावलाय हे दिसून येतं.. डायलॉगबाजी असो, त्या कॅरेक्टरमध्ये वावरणं असो किंवा त्याचा फूलफ्लेज्ड अभिनय, या सिनेमात त्याला बीट करणं खरंच कठिण आहे..  केवळ हावभाव आणि बॉडी लॅग्वेजनंच तो तुम्हाला पोट धरुन हसायला लावणार आहे.  त्याच्या कॅरेक्टरला त्यानं पूर्ण न्याय देलाय असं म्हणायला हरकत नाही..
 
अनिकेतच्या एकूण कारर्किर्दीतला एक वेगळाच अनिकेत पोश्टर बॉईजमध्ये पहायला मिळतो. एक अत्यंत लाऊड आणि ग्लॉसी अशी व्यक्तिरेखा यात त्यानं साकारली आहे.. त्याच्या आजवरच्या सिनेमांचा आढावा घेतला तर अनिकेत हा एक चॉकलेट बॉय म्हणून ओळखला गेलाय पण या सिनेमात त्यांन साकारलेला अर्जुन जगताप नक्कीच त्याच्यासाठी एक इमेज ब्रेकर ठरेल यात शंका नाही.
 
दिग्दर्शन :
पोश्टर बॉईज ही फिल्म दिग्दर्शक समीर पाटील यांचा हा एक वेगळाच प्रयत्न आहे.. हटके कास्ट, हटके कथानक, हटके डायलॉग्स आणि त्याची योगरित्या हाताळणी या सगळ्या गोष्टी परफेक्ट मार्गी लागल्या आहेत.. याचं सगळं श्रेय जातं दिग्दर्शक समीर पाटील यांना. अगदी सिनेमाच्या सुरुवाती पासून शेवटापर्यंत सिनेमाचा फ्लो कुठेही खटकत नाही.. समीरच्या दिग्दर्शनाप्रमाणेच त्यानं लिहिलेले संवादही तितकेच ताकदीचे आहेत. एक कम्प्लीट धमाल विनोदी सिनेमा असावा तर असा..
 


 

संगीतः
लेस्ली लुईसनं संगीतबद्ध केलेल्या या सिनेमातली गाणी अगदी सिनेमाच्या फ्लेवरप्रमाणेच कम्पोज करण्यात आली आहेत.. पोश्टर बॉईज हे प्रमोशनल गाणं सध्या धमाल गाजतंय. पोश्टर बॉईज सिनेमाच्या टायटल साँग व्यतिरिक्त सिनेमातली बाकी गाणीही बरी आहेत..
 
एकूण सिनेमा : 

पोश्टर बॉइज हा सिनेमा केवळ मनोरंजन प्रधान सिनेमा आहे असं नाही तर या सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्नही यात करण्यात आलाय.. आजच्या सिस्टिमवर,  भाष्य करणारा हा सिनेमा आहे..   रोहित शेट्टी, अन्नू मलिक, फराह खान, सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर सिनेमात सरप्राइज एलिमेंट्स म्हणून दिसतात.. एवढंच नाही तर श्रेयसनं ही यात एक भूमिका केली आहे.. त्याचा तो रोल अत्यंत छोटा असलातरी त्याचा स्क्रिनवरचा वावर खूपच अपिलिंग वाटतो. सिनेमा स्टार्ट टू एन्ड तुम्हाला हसवतो. सिनेमाचा फर्स्ट हाफ कधी संपतो खरंतर कळतही नाही.. खरंतर सिनेमाच्या स्क्रिनप्लेचं हे यश आहे .. सिनेमाचा दुसरा भागही तुम्हाला तितकाच बांधून ठेवतो.. एकुणच काय तर श्रेयस तळपदेनं जरी मोठ्या गॅपनंतर सिनेमा केला असलातरी त्यानं एक अत्यंत चांगला सिनेमा प्रेक्षकांसाठी आणलाय यात शंका नाही. 
 
रेटिंग:
पोश्टर बॉइज हा सिनेमा आपल्याला हसवतो, आपलं मनोरंजन करतो त्याचबरोबर सामाजिक भानही जपतो.. एक कम्प्लिट धमाल विनोदी असा हा सिनेमा आहे.. सिनेमा पाहताना  थोड्या वेळासाठी का होइना, तुम्ही तुमचे टेन्शन्स, तुमचा स्ट्रेस नक्कीच विसरुन जाल यात काहीच शंका नाही.  या सिनेमाला मी देतेय 4 स्टार्स..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.