मुंबई : या गाण्यातले सूर एकमेकांत मिसळण्याऐवजी ते वेगवेगळे झालेत. खरं तर हे फक्त गाणं नव्हतं. तर संपूर्ण देशाला एकत्र आणणारी ती एक शक्ती होती. हे गाणं दूरदर्शनवर लागलं की, ते संपेपर्यंत लोक जागचे हलत नव्हते.
१५ ऑगस्ट १९८८ ला पहिल्यांदा हे गाणं दूरदर्शनवर प्रसारित झालं. लोकसंचार परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग होता.
पण आता २८ वर्षांनंतर या गाण्याचं बेसूर भांडण समोर आलंय. या गाण्याचे संगीतकार नक्की कोण, याचा हा वाद आहे. ही गीत आपण संगीतबद्ध केलं, असा अशोक पत्कींचा दावा आहे.
अशोक पत्कींचा हा दावा खोडून काढलाय भीमसेन जोशी यांचे पुत्र जयंत जोशी यांनी, 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणं भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलं, असं जयंत जोशी यांचं म्हणणं आहे.