मॉडेल पुजा मिश्राची हाणामारी कॅमेऱ्यात कैद

पुजा मिश्राने दिल्लीतील करोल बागमधील दुकानाच्या स्टाफला चांगल्याच शिव्या घातल्या.

Updated: Oct 13, 2015, 12:31 PM IST

नवी दिल्ली : बिग बॉसची यापूर्वीची सहभागी मॉडेल पुजा मिश्रा भांडणासाठी प्रसिद्ध आहे. ती कधी हॉटेलमध्ये तर कधी दुकानात जोरदार भांडण करतांना दिसते. शिव्यांना शिव्यांनी उत्तर देऊन पूजा मिश्रा भांडण करते.

पुजा मिश्राने दिल्लीतील करोल बागमधील दुकानाच्या स्टाफला चांगल्याच शिव्या घातल्या, एका वयस्कर सिक्युरिटी गार्डसह एका स्टाफलाही पुजा मिश्राने कानाखाली लगावली. पुजा मिश्राचा हा ड्रामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पुजा मिश्राने एक पिस्तुलही कर्मचाऱयांना दाखवलं मात्र, हे पिस्तुल खेळण्यातलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पुजा मिश्राचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.