मुंबई : अक्षय कुमार पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय... अक्षय कुमारचा हा आगामी सिनेमा म्हणजे दशकभरातला सर्वात सुपरहिट रिमेक असेल, अशी चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे.
'विसारानई' असं या सिनेमाचं नाव आहे.
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडगोळी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आलीय. प्रियदर्शननं अक्षयला 'हेराफेरी'तून पुन्हा एकदा कॉमेडी जेनरमध्ये रिलॉन्च केलं होतं.
ही एका ऑटो ड्रायव्हरची कथा आहे जो भ्रष्टाचार आणि राजकारणामुळे मोठ्या अडचणीत सापडतो... आणि मग तो याविरुद्ध बंड पुकारतो.
रुस्तम या सिनेमात अक्षय कुमार एका नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिसेल. ५० च्या शतकातल्या सेटअपवर हा सिनेमा चित्रीत होईल. ब्रिटिश कालखंडानंतर भारत कसा होता, याचं चित्रण या सिनेमातून दिसेल.
या सिनेमात अक्षय कुमार मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणारी व्यक्ती असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, नमस्ते इंग्लंड २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारनं त्याच्या फॅन्सना तर अगोदरपासून वचन दिलंय की वर्षभरात कमीत कमी चार चित्रपटांत तरी तो दिसेल. २०१६ मधला हा त्याचा शेवटचा सिनेमा असू शकतो.
अक्षय कुमारनं रजनीकांत स्टारर रोबोट २ साठी 'नमस्ते इंग्लंड'चं शूट पुढे ढकललं. रजनीकांतच्या या सिनेमात अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
एअरलिफ्टचा को प्रोड्युसर असलेल्या निखिलशी अक्षयचं आता चांगलंच सूत जमलंय. हा सिनेमा ऋतिकच्या हातातून निसटलाय. अशात हा प्रोजेक्ट आता अक्षयकडे जाण्याची मोठी शक्यता आहे.
रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा अक्षय कुमार सोबत फायनल झालाय. हा सिनेमा प्रियदर्शन प्रोड्युस करणार आहे. सिनेमाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही.
दक्षिणेत धमाका उडवून देणाऱ्या 'कत्थी' या सिनेमाचा रिमेकही आपल्याला लवकरच बॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणं आणि त्यांची आत्महत्या यावर याचं कथानक अवलंबून आहे. नुकतंच, अक्षयनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतही जाहीर केली होती.
'कत्थी'च्या रिमेकचं नाव असेल इक्का... या सिनेमात काम करण्यासाठी सलमान खानही उत्सुक असल्याचं समजतंय. पण, या सिनेमासाठी मुरुगोदास यांना अक्षयच परफेक्ट वाटतोय.