परिणीती नाही तर हे आहे सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.

Updated: Mar 26, 2016, 03:30 PM IST
परिणीती नाही तर हे आहे सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.

काही दिवसांपूर्वी सुशांत आणि अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजत होतं... परंतु, यातच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चांणा उधाण आलं. मग यामध्ये सुशांतचं अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत असलेल्या संबंधांमुळे हे ब्रेक अप झाल्याचंही सांगितलं गेलं. परंतु, आता मात्र सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण समोर आलंय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिताची नात्याबद्दलची असुरक्षिततेची भावना हे नातं तुटण्याला कारणीभूत ठरल्याचं समजतंय. 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर भेटल्यापासून गेल्या सहा वर्षांपासून हे दोघे जण नात्यात आहेत. 

परंतु, अंकिता सुशांतबाबतीत फारस पझेसिव्ह असल्याचं म्हटलं जातंय. सुरूवातीला सुशांतनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण नंतर मात्र त्यानं स्वत:ला सिद्ध करणं बंद केलं... आणि काहीही बिघडणार नाही, असं अंकिताला पटवून देण्यात सुशांत अखेर अपयशी ठरला. 

त्यानंतर अवॉर्ड फंक्शनमध्येही तो एकटाच दिसला. इतकंच नाही तर सुशांतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही अंकिता हजर नव्हती.