सनीसोबतच्या चित्रपटावर आमिरचं स्पष्टीकरण

आमिर खान आणि सनी लियोनी चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

Updated: Apr 2, 2016, 10:52 PM IST
सनीसोबतच्या चित्रपटावर आमिरचं स्पष्टीकरण title=

मुंबई: आमिर खान आणि सनी लियोनी चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्यांचं आमिर खाननं खंडन केलं आहे. 

डेली बेली या सिनेमाचे दिग्दर्शक अभिनय देव यांनी आपल्या नव्या चित्रपटसाठी सनी लियोनी आणि आमिर खानबरोबर करार केला असल्याचं बोललं जात होतं. 

एका कार्यक्रमादरम्यान आमिरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी सनीबरोबर आता कोणता चित्रपट कर नाहीये, पण तिच्याबरोबर चित्रपट करायला मला नक्कीच आवडेल, अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली.