पूजा मिश्राची छेडछाड; सोनाक्षी-पूनम सिन्हावरही गुन्हा दाखल

'बिग बॉस सीझन ५' मध्ये दिसलेल्या अभिनेत्री-मॉडेल पूजा मिश्रा हिनं आपली छेडछाड झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय... या प्रकरणात तीनं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सिन्हा यांच्यावरही आरोप केलाय. 

Updated: Apr 16, 2015, 09:13 PM IST
पूजा मिश्राची छेडछाड; सोनाक्षी-पूनम सिन्हावरही गुन्हा दाखल title=

नवी दिल्ली : 'बिग बॉस सीझन ५' मध्ये दिसलेल्या अभिनेत्री-मॉडेल पूजा मिश्रा हिनं आपली छेडछाड झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय... या प्रकरणात तीनं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सिन्हा यांच्यावरही आरोप केलाय. 

उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आलीय. सोनाक्षी सिन्हा, पूनम सिन्हा, ईशा कोप्पीकर, ईशाचा पती आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध पूनमनं ही एफआयआर दाखल केलीय. आपलं करिअर खराब व्हावं, यासाठी सोनाक्षीसोबत इतरांनी मिळून हा कट रचल्याचा दावाही पूजानं केलाय. 

ही घटना आहे ११ एप्रिल रोजीची... एका कॅलेंडर लॉन्चिंगसाठी पूनम उदयपूरला गेली होती. पूजानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, यावेळी तिला पेयामध्ये नशेचे पदार्थ दिले गेले. ज्यामुळे, तिला झोप आली. जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिला जाणवलं की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे..... 


पूनम मिश्रा

सोबतच आपलं काही सामान चोरी झाल्याचंही पूजानं आपल्या तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली काही कॅश आणि ज्वेलरीही चोरी झाल्याचं मॉडेलनं म्हटलंय. काही अज्ञात लोकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याची तक्रार तिनं केलीय. यासंबंधी एफआयआर नोंदवण्यात आलीय.

परंतु, तिनं दिलेल्या तक्रारीत अनेक विरोधाभास आहेत, असंही पोलिसांनी म्हटलंय. हा केवळ एक पब्लिस्टि स्टंट असू शकतो, असाही पोलिसांना संशय आहे. यासाठी हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.