पूनम पांडे Vs शर्लिन चोप्रा... म्हणतात `मीच हॉट`

मॉडेल शर्लिन चोप्रा आणि किंगफिशर मॉडेल पूनम पांडे यांच्यात प्रसिद्धीसाठी युद्धच सुरु झाले आहे.

Updated: Sep 12, 2012, 12:33 PM IST

www.24taas.com
मॉडेल शर्लिन चोप्रा आणि किंगफिशर मॉडेल पूनम पांडे यांच्यात प्रसिद्धीसाठी युद्धच सुरु झाले आहे. या दोघीही मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर स्वतःची एकामागून एक हॉट छायाचित्रे अपलोड करत आहेत. तसे पाहता शर्लिनच्या छायाचित्रांपुढे हॉट हा शब्द जरा छोटाच वाटतो.
शर्लिनने शनिवारी रात्री स्वतःची काही पोर्न स्टाईल छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट केली आहेत. ट्विटर ट्रेंडमध्ये छायाचित्रे यावीत अशी इच्छा शर्लिनची होती. दुस-याच दिवशी म्हणजे रविवारी शर्लिनची ही इच्छा पूर्णही झाली. रविवारी शर्लिनचे फोटोज ट्विटर ट्रेंडमध्ये आले होते.
शर्लिनची ही छायाचित्रे अतिउत्तेजक असल्यामुळे ट्विटरने तिची छायाचित्रे काढून टाकली होती. मात्र तोपर्यंत शर्लिन पब्लिसिटी प्राप्त करण्यात यशस्वी झाली होती. पूनमनेही रविवारी स्वतःची बेडरुम छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करुन चाहत्यांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्लिनच्या पुढे पूनमची छायाचित्रे खूपच साधी वाटत आहेत.