श्रेयस तळपदेच्या 'पोश्टर बॉईज'ची कोटीचे उड्डाण

श्रेयस आणि दीप्ती तळपदेच्या आफ्लुयेन्स मुव्हीस प्रा.लिमिटेडच्या बॅनरखाली 1 ऑगस्टला प्रदर्शित झालेला 'पोश्टर बॉईज'ची जादू बॉक्स ऑफिसवर चांगलीच चालली. आठवड्यात दीड कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

Updated: Aug 8, 2014, 11:13 PM IST
श्रेयस तळपदेच्या  'पोश्टर बॉईज'ची कोटीचे उड्डाण title=

मुंबई : श्रेयस आणि दीप्ती तळपदेच्या आफ्लुयेन्स मुव्हीस प्रा.लिमिटेडच्या बॅनरखाली 1 ऑगस्टला प्रदर्शित झालेला 'पोश्टर बॉईज'ची जादू बॉक्स ऑफिसवर चांगलीच चालली. आठवड्यात दीड कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

राज्यात 167 पडद्यावर प्रदर्शित झालेला पोस्टर बॉईजने 6 दिवसात 1.6 कोटींची कमाई केली आहे. 6 दिवसात 1.6 कोटींची कमाई करत या मराठी चित्रपटाने एक नवा रेकॉर्डही प्रस्थापित केला आहे.

मराठी चित्रपटाला मिळालेल्या या यशामुळे श्रेयस तळपदे खूश आहे, असं  त्याने म्हटलं आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांसह इतर कलाकारांनीही तोंड भरून कौतुक केलं आहे तर अनेक अभिनेत्यांनी ट्विटरवरून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांशी निगडीत असून त्यात फुल टू कॉमेडीही आहे.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.