'या' कंपनीने Airtel, Jio चं वाढवल टेन्शन! 100Mbps प्लॅनमध्ये फ्री मिळतंय OTT

Tata Play Fiber:  यूजर्सना अनेक OTT ॲप्स विनामूल्य वापरता येणार आहेत.  

Pravin Dabholkar | Updated: Dec 12, 2024, 07:46 PM IST
'या' कंपनीने Airtel, Jio चं वाढवल टेन्शन! 100Mbps प्लॅनमध्ये फ्री मिळतंय OTT title=
टाटा प्ले फायबर

Tata Play Fiber: सध्या मार्केटमध्ये एअरटेल, जिओ यांचा दबदबा आहे. मोबाईल रिचार्ज, डेटा प्लानपासून ते फायबर सेवेपर्यंत अनेक सेवा कमी पैशात पुरवल्या जातात. पण आता एका कंपनीमुळे एअरटेल, जिओ यांचं टेन्शन वाढवलं आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या टाटा प्ले फायबरने आपल्या यूजर्ससाठी हाय स्पीड डेटा प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनेक OTT ॲप्स विनामूल्य वापरता येणार आहेत.  

फ्रीमध्ये मिळणार ओटीटी 

टाटा प्लेचा हा प्लॅन एअरटेल आणि जिओच्या ब्रॉडबँड प्लॅनला टक्कर देणारा आहे. कंपनी सध्या त्यांच्या यूजर्सना 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांची वैधता असलेले प्लॅन ऑफर करतेय. या प्लॅन्समध्ये यूजर्सना 100 एमबीपीएसच्या हाय स्पीडवर इंटरनेट दिले जात आहे. तसेच त्यांना OTT ॲप्समध्ये मोफत वापरता येणार आहे.टाटा प्ले फायबरच्या एका महिन्याच्या प्लॅनसाठी यूजर्सना फक्त 900 रुपये खर्च करावे लागतील. यात कंपनी 100Mbps वर लाइट, प्राइम आणि मेगा प्लॅन ऑफर करतेय. 900 रुपयांमध्ये तुम्हाला कंपनी पूर्ण महिन्यासाठी 100Mbps लाइट प्लॅन ऑफर करतेय. एवढंच नव्हे तर तुम्ही 12 महिन्यांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला दरमहा 750 रुपये लागतील. जर एकाचवेळी संपूर्ण वर्षाचा प्लान घेतलात तर तुम्हाला जीएसटीसह 9,000 रुपये भरावे लागतील. टाटा प्लेच्या या फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी 3.3TB डेटा दिला जातो. OTT प्रेमींचा विचारदेखील यात करण्यात आलाय. Apple TV+, Disney+ Hotstar यासह 4 ॲप्स तुम्हाला वर्षभर मोफत वापरता येणार आहे. याव्यतिरिक्त 200 हून अधिक थेट टीव्ही चॅनेल विनामूल्य ऑफर करण्यात आले आहेत.

काय आहे प्राइम प्लान? 

टाटा प्ले फायबरच्या प्राइम प्लॅनमध्ये यूजर्सना एका महिन्यासाठी सुमारे 800 रुपये मोजावे लागतील. हा प्लॅन 12 महिन्यांसाठी असून यासाठी तुम्हाला 9,600 रुपये अधिक GST ​ची रक्कम द्यावी लागेल. यामध्ये यूजर्सना 6 OTT ॲप्स निवडण्याचा पर्याय असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना लाइट प्लॅनसारखे इतर अनेक फायदे मिळतील.

काय आहे मेगा प्लान?

मेगा प्लानमध्ये यूजर्सना एका महिन्यासाठी 950 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनसाठी युजर्सना 11 हजार 450 रुपये अधिक जीएसटी ​​खर्च करावा लागेल. या प्लॅनमध्ये युजर्सना सर्व ओटीटी ॲप्समध्ये प्रवेश मिळेल. एवढेच नव्हे तर तुम्हाला 200 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सही पाहता येणार आहे.