प्रकाश झा म्हणतात असहिष्णूता ही तर करण जोहरची मानसिक अवस्था

पुणे : असहिष्णूतेवरुन सुरु असलेल्या वादात आता दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही उडी घेतलीये.

Updated: Jan 24, 2016, 09:52 AM IST
प्रकाश झा म्हणतात असहिष्णूता ही तर करण जोहरची मानसिक अवस्था title=

पुणे : असहिष्णूतेवरुन सुरु असलेल्या वादात आता दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही उडी घेतलीये. त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर टीका केली आहे.

"करण जोहर असहिष्णुतेविषयी जे काही बोलला ते त्याच्या मनातील बोलला असेल; देशातील परिस्थितीविषयी नाही. त्याच्या मनाच्या अवस्थेला इतक्या गंभीरपणे घेण्याची काही गरज नाही. त्याच्या मानसिक अवस्थेविषयी बोलणे हा त्याचा अधिकार आहे." असे झा म्हणाले. पुण्यात 'जय गंगाजल' या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ते बोलत होते. 

"आपला देश आणि समाज खूप सशक्त आहेत. देशात संपूर्ण समाज इतरांच्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि विचारांचा आदर करतो," असेही ते पुढे म्हणाले.

जयपूर लिटररी फेस्टिवल मध्ये बोलताना करण जोहरने मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. देशात भाषण स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचेही तो म्हणाला होता. यामुळे नवा वाद निर्माण झाला होता.