अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणचा एकत्र डान्स जलवा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण संजय लिला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साली यांची पिरिअड ड्रामा फिल्म 'बाजीराव मस्तानी' यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.

Updated: Apr 21, 2015, 02:35 PM IST
अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणचा एकत्र डान्स जलवा title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण संजय लिला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साली यांची पिरिअड ड्रामा फिल्म 'बाजीराव मस्तानी' यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.

आपल्या आधीच्या 'देवदास' या सिनेमात "डोला रे डोला' या गाण्याप्रमाणे भन्साळी नविन गाणे बाजीराव मस्तानीमध्ये सादर करणार आहेत. डोला रे डोलाप्रमाणे या गाण्याची थिम असणार आहे. या गाण्याचे नृत्य रेमो डिसूजा बसविणार आहे. त्याची मदत घेण्यात आली आहे.

डोला रेमध्ये ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित यांची एकत्र नृत्य सादर केले होते. आताचे गाणे हे 12 दिवसात पूर्ण केले जाईल. त्यासाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून 50 पेक्षा जास्त बॅकग्राऊंड डान्सर नृत्य असणार आहेत. या गाण्याचे नृत्य कठिण असून दीपिका आणि प्रियंकाला 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस याचा अभ्यास करावा लागणार आहे.

12 वर्षानंतर समकालीन अभिनेत्री एकाच वेळी एकाच सिनेमात नृत्य करताना पाहायला मिळतील. लावणी नृत्यावरील हे गाणे असणार आहे. दोघींनी जास्त मेहनत घेतली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.