माझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?

ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.

Updated: Oct 23, 2016, 06:56 PM IST
माझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का? title=

मुंबई : ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.

राज ठाकरे आणि करण जोहरमध्ये मध्यस्ती करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शबाना आझमींनी टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशप्रेमाची किंमत 5 कोटी ठेवली आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्ती केली अशी बोचरी टीका आझमींनी केली आहे.

सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट रिलीज करायचं सर्टिफिकेट दिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही हा चित्रपट रिलीज करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेव्हाच हा वाद संपवायला हवा होता. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कायदा आणि सुव्यवस्था पाळणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, तसं न करता ते मध्यस्ती करायला गेले. भाजपनं मुख्यमंत्र्यांकडे याबाबत स्पष्टीकरण मागावं अशी मागणी त्यांनी केली आहे.