मुंबई : तुम्ही कसे जगता? दुसऱ्यांच्या मताने कि स्वत:च्या इच्छेने. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणतो हे प्रश्न झुगारुन तुम्ही जगा. तुम्ही कशाही असाल तर स्वत:साठी सुंदर आहात. तुम्ही जशा आहात तशाच सुंदर आहात. असंच काहीसं सांगतेय राधिका आपटे नव्या व्हिडीओतून. प्रत्येक मुलीने पाहावा असा. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
तुमचे केस विस्कटलेलेल कुरळे कसेही असतील. तुमचे शरीर चांगले आहे. ती बदलेल. मूडी होईल. उंची कधी लहान नसते. मात्र बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनावरुन ते ठरते. तुमच्या स्किनचा कलर कोणत्याही प्रकारचे शेडकार्ड नसते. तुमचे वाकडेतिकडे पाय, डेंटिस्टला घाबरवणारे दात, लोकांना झोपेतून जागे करणारे हास्य आणि तुमच्या काही विचित्र सवयी हे सर्व सुंदर आहे तुमच्यासाठी
कोणासाठी बदलू नका. जग तुम्हाला सांगेल असे करा, तसे करा, असे दिसा, तसे दिसा मात्र तुमच्या मनाला जसे दिसावेसे वाटेल तसे करा. आपल्या जीवनातील लहान मोठे क्षण भाड्याने देऊ नका. ही लाईफ तुमची आहे आणि फक्त तुम्हाला ती जगायची आहे. त्यामुळे जगणं सोडून नका. कारण तुम्ही सुंदर आहात.