सैराटचा ट्रेलर आला रे...

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराटचा ऑफिशियल ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Updated: Apr 22, 2016, 02:27 PM IST
सैराटचा ट्रेलर आला रे... title=

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराटचा ऑफिशियल ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

यापूर्वी सैराटच्या टीझर, तसेच त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. सैराटची सर्वच गाणी प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडलीयेत. चांगला प्रतिसाद या गाण्यांना मिळतोय.

सैराटची गाणी आल्यानंतर त्याचा ट्रेलर कधी येणार याबाबत सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. यात परशा आणि आर्चीच्या प्रेमाचा अनोखा रंग दाखवण्यात आलाय.गाणी आणि टीझरप्रमाणेच या ट्रेलरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 

पाहा याचा ट्रेलर