शास्त्रीय संगीताच्या मैफिलींवरच वेळेचं बंधन का? - राहुल देशपांडे

शास्त्रीय संगीतांच्या मैफिलीं रात्री 10 वाजता बंद करण्याची सक्ती का करता असा उद्विग्न सवाल प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

Updated: Dec 13, 2016, 11:07 AM IST
शास्त्रीय संगीताच्या मैफिलींवरच वेळेचं बंधन का? - राहुल देशपांडे title=

मुंबई : शास्त्रीय संगीतांच्या मैफिलीं रात्री 10 वाजता बंद करण्याची सक्ती का करता असा उद्विग्न सवाल प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

राहुल देशपांडेंनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर टाकलेल्या एका पोस्ट द्वारे ही नाराजी व्यक्त केलीय. काल रात्री राहुल देशपांडेंच्या घराजवळून एक मिरवणूक काढण्यात आली. रात्री 11 वाजून गेले तरी मिरवणुकीचा धांगडधिंगा सुरू होता. देशपांडेंनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी अनेकदा फोन केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

त्यामुळं संतप्त होऊन राहुल देशपांडेंनी मुख्यमंत्री आणि एकूणच प्रशासनाला गणपती, ईद, अशा सणांना चालणारा डीजेचा धिंगाणा चालतो मग आमच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरच वेळेचं बंधन का घालता असा उद्विग्न सवाल केलाय.