www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमान खानसोबत काम करणं हे अनेक अभिनेत्रींना लक्की ठरतं, असेच चांगले दिवस सध्या एका अभिनेत्रीचे सुरू आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आता साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये `द लायवा` म्हणजेच रजनीकांत सोबत काम करायला मिळत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे शुटिंगच्या दरम्यान रजनिकांत सोनाक्षीच्या प्रेमात पडला आहे.
या प्रेमाच्या मागे कारणही तसेच आहे. सोनाक्षी आणि रजनीकांत मैसूरमध्ये शुटींग करत असताना, रजनीकांतला सोनाक्षीचं अभिनयातील कौशल्य, तिची काम करण्याची वृत्ती, तिचा प्रोफेशनल अंदाज आणि दर वेळी नवीन काही तरी शिकण्याची वृत्ती या खुपचं आवडल्या आहेत. या कारणाने रजनीकांत सोनाक्षीच्या कामावर फिदा झाला आहे.
सुत्रांच्या आधारे सोनाक्षी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. यावेळी साऊथच्या मुलींसारखं दिसणं आणि बोलणं हे खूप महत्वाचं ठरणार होतं. पण सोनाक्षीने पहिल्याच दिवशी पहिलाच सिन ओके केला आणि अनेकांना आश्चर्यात टाकलंय. सोनाक्षीचं हा परफेक्ट अंदाज सगळ्यांना भावला आहे. या कारणानेच आता सोनाक्षीचा साऊथ सिनेमा किती चांगला होईल आणि तो किती हिट होईल हे पहावं लागेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.