कॅटरिनाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा

कॅटरिना कॅफसोबत असलेल्या संबंधाबाबत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. रणबीरने सांगितलं की त्याच्या आयुष्यात कॅटरिनाचा काय रोल आहे. सुरुवातीला तो त्याच्या लव्ह लाईफवर बोलणं टाळत होता पण सध्या रणबीर आणि कॅटरिना 'जग्गा जासूस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. प्रमोशनसाठी रणबीर आणि कॅटरिना प्रयत्न करतायंत.

Updated: Sep 1, 2016, 01:42 PM IST
कॅटरिनाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा title=

मुंबई : कॅटरिना कॅफसोबत असलेल्या संबंधाबाबत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. रणबीरने सांगितलं की त्याच्या आयुष्यात कॅटरिनाचा काय रोल आहे. सुरुवातीला तो त्याच्या लव्ह लाईफवर बोलणं टाळत होता पण सध्या रणबीर आणि कॅटरिना 'जग्गा जासूस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. प्रमोशनसाठी रणबीर आणि कॅटरिना प्रयत्न करतायंत.

एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने म्हटलं की, तो कॅटरिनाच्या प्रेमात कधी पडला होता. त्याने म्हटलं की, जेव्हा ते 'अजब प्रेम की गजब कहानी' सिनेमाचं शूटिंग करत होते. तेव्हा आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आलो. जेव्हा रणबीरचं दीपिका पादुकोणसोबत ब्रेकअप झाला होता आणि दुसरीकडे कॅटरिना सलमान खानला डेट करत होती. 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये सलमान खानने एक स्पेशल गोष्ट देखील केली होती.

रणबीरला जेव्हा विचारलं गेलं की, कॅटरिना तुझ्या जीवनात किती महत्त्वाची आहे त्यावर त्याने म्हटलं आहे की, 'माझ्या जीवनात आई-वडिलांनंतर कॅटरिनाचं स्थान आहे. पण लोकं ही गोष्ट नाही समजू शकत. मला समजवायचं देखील नाही आहे. पण हा मुद्दा मला मीडियामध्ये आणायचा देखील नाही.'