रणवीर सिंगने केला शाहरुखचा डीडीएलजेचा 'तो' सीन

अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे.

Updated: Feb 8, 2017, 12:11 PM IST
रणवीर सिंगने केला शाहरुखचा डीडीएलजेचा 'तो' सीन title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं शाहरुखबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करतो. नुकाताच त्याने डीडीएलजे मधला ट्रेनचा सीन केला आहे. आणि या सीनमध्ये त्याची सिमरन होती प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य.

रणवीरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सोबतच त्याने म्हटलं आहे की असा स्टंट करण्याचा प्रयत्न करु नका. काही दिवसांपूर्वी रणवीरने जबरा फॅन या गाण्यावर डबस्मॅश केला होता.

पाहा व्हिडिओ