रेहमानची ओढ आता हॉलिवूडकडे

बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानने हॉलीवुडच्या बियोंसे या गायिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये. म्युझुक डायरीज या कार्यक्रमात रेहमानने ही इछा व्यक्त केली. 

Updated: May 29, 2016, 02:42 PM IST
रेहमानची ओढ आता हॉलिवूडकडे title=

मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानने हॉलीवूडच्या बियोंसे या गायिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये. म्युझुक डायरीज या कार्यक्रमात रेहमानने ही इछा व्यक्त केली. 

बियोंसेसोबतच जिमी इविंगबरोबरही रेहमानला काम करायला आवडेल असे तो म्हणाला. या दोघींबरोबर लवकरच रेहमान एका अल्बमवर काम देखील सुरू करणार आहे.
आश्चर्याची गोष्ट अशी की रेहमानने हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरबरोबर काम करण्यास साफ नकार दिलाय. रेहमानच्या मते जस्टिनला सध्या एकट्यानेच काम करू दे.

 

या आधीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हॉलिवूडमधल्या कलाकारांसोबत कामे केली आहेत. रविशंकर, सुनिधी चौहान, सोनू निगम, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांसारख्या कलाकारांनी हॉलिवूडच्या कलाकारांसोबत अनेक फिल्म्स, सिरियल्स आणि म्यूझिक या क्षेत्रांत कामे केली आहेत.