मुंबई : अभिनेते ऋषी कपूर यांच्या निशाण्यावर आता ‘झारा’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. त्यांनी ‘मन की बात’ व्यक्त करताना, तुम्ही मोफत घ्या कटोरा असे म्हटले आहे.
ऋषी कपूर यांना ‘झारा’ ब्रॅण्डची प्रमोशनल स्ट्रॅटेजी पसंत पडलेली नाही. त्यांनी आपला राग ट्विटरवर पोस्ट करुन व्यक्त केलाय. लवकरच सुरू होणाऱ्या आपल्या सेल संदर्भातील फोटो झाराने सोशल मीडियावर पोस्ट केली. यात लो-हाईट टॉप आणि रिप्ड जीन्सच्या फोटोचा समावेश होता.
ऋषी कपूर यांनी हे फोटो ट्विटरवर पोस्ट करून त्याखाली 'दोन खरेदी करा आणि एक भीक मागण्याचा कटोरा मोफत मिळवा. झाराचा सेल' त्याखाली म्हटले आहे. ऋषी कपूर यांच्या या ट्विटला आत्तापर्यंत अनेकांनी रिट्विट केले आहे. यात करण जोहरचादेखील समावेश आहे.
Buy two get one begging bowl free. Sale at Zara's pic.twitter.com/keoWmlbw70
— Us Kapoor's! (@chintskap) June 27, 2016