रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठरले

बॉलिवूडचं सगळ्यात गोड जोडपं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनेलिया आणि रितेशला गेल्या आठवड्यात दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. 

Updated: Jun 12, 2016, 07:34 PM IST
रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठरले

मुंबई : बॉलिवूडचं सगळ्यात गोड जोडपं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनेलिया आणि रितेशला गेल्या आठवड्यात दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. 

आपल्याला दुसऱ्यांदा मुलगा झाल्याची गोड बातमी रितेशने लगेचच सोशल मीडियावर शेअर केलेली.

Add Zee News as a Preferred Source

काय ठरले नाव ?  

आठवड्याभरातच रितेश आणि जेनेलियाने आपल्या मुलाचे नाव ठरविले सुद्धा. राहील हे नाव या दोघांनी ठरविले आहे.

राहीलचा जन्म होताच ती बातमी रितेशने आपल्या पहिल्या मुलाच्या (रिआन) वतीने ट्विटरवर पोस्ट केलेली. रितेश नेहमीच आपल्या पर्सनल आयुष्यातील गोड क्षण आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर करतो. आता त्याच्या फॅन्सना कधी एकदा राहीलचे फोटोज रितेश अपलोड करणार याचीच उत्सुकता आहे.

दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या आनंदासोबतच रितेशचा हाऊसफुल ३ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवतोय.

 

 

About the Author