सलमानने धोका दिल्यानंतर देश सोडून गेली ही हिरोईन

सोमी अली एक अशी हिरोईन आहे जिचे नाव तिच्या चित्रपटांसाठी नव्हे तर बॉयफ्रेंडमुळे अधिक ओळखले जाते. सोमीच्या चित्रपटांबद्दल काहींनांच माहिती असेल मात्र सलमानसोबतच्या तिच्या अफेयरच्या चर्चा सगळ्यांनाच माहित असतील. 

Updated: Aug 13, 2016, 03:37 PM IST
सलमानने धोका दिल्यानंतर देश सोडून गेली ही हिरोईन title=

मुंबई : सोमी अली एक अशी हिरोईन आहे जिचे नाव तिच्या चित्रपटांसाठी नव्हे तर बॉयफ्रेंडमुळे अधिक ओळखले जाते. सोमीच्या चित्रपटांबद्दल काहींनांच माहिती असेल मात्र सलमानसोबतच्या तिच्या अफेयरच्या चर्चा सगळ्यांनाच माहित असतील. 

सोमीच्या नंतर सलमानच्या जीवनात अनेक मुली आल्या. मात्र सोमी अलीचे सलमानच्या जीवनातील महत्त्व खास राहिले. जिच्यासाठी सलमानने संगीता बिजलानीलाही धोका दिला. 

सोमीचा जन्म पाकिस्तानात झाला होता. सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती फ्लोरिडाला निघून गेली. सोमीने सलमानचा मैने प्यार किया हा सिनेमा पाहिला आणि ती त्याच्या प्रेमात पडली. 

सोमी अलीचे त्यावेळी वय फक्त १५ वर्षे होते. सलमानच्या प्रेमासाठी ती मुंबईत आली आणि मॉ़डेलिंग करु लागली. मॉडेलिंगदरम्यान तिला काही चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. यातील एक चित्रपट सलमानसोबत होता तो म्हणजे बुलंदी. हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. मात्र सलमान आणि सोमीचे सूत जुळले. 

यामुळे सलमान आणि संगीता यांचे ठरलेले लग्नही मोडले. याचदरम्यान सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या आली आणि त्याचे तिच्यावर प्रेम जडले. सलमानने धोका दिल्याने सोमी फिल्मी दुनियेला सोडून कायमची फ्लोरिडाला निघून गेली. सोमीने परत जाऊन आपला अभ्यास पूर्ण केला आणि बिझनेस सुरु केला.