आई हिंदू, वडील मुस्लिम मी भारतीय - सलमान

काळवीट शिकारीसाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खाननं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळलेत. सर्व साक्षीदार खोटं बोलत असल्याचं सांगत त्यानं आरोपांचं खंडन केलंय. 

Updated: Apr 29, 2015, 02:43 PM IST
आई हिंदू, वडील मुस्लिम मी भारतीय - सलमान title=

जोधपूर: काळवीट शिकारीसाठी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खाननं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळलेत. सर्व साक्षीदार खोटं बोलत असल्याचं सांगत त्यानं आरोपांचं खंडन केलंय.

तसंच माझी आई हिंदू तर बाबा मुस्लीम आहेत, म्हणून माझा धर्म भारतीय आहे असं सलमान कोर्टात म्हणाला. काळवीट शिकार प्रकरणात जबाब नोंदवताना तुझा धर्म कोणता असा प्रश्न विचारला असता सलमाननं हे उत्तर दिले आहे.  

या प्रकरणी सलमान खान जोधपूर कोर्टात हजर झाला. यावेळी कोर्टात सलमानचा जबाब नोंदवण्यात आला. १९९८ साली 'हम साथ साथ है' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान राजस्थानच्या कनकनी गावात काळवीटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर लावण्यात आलाय. सलमानसोबतच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम या अभिनेत्रींवरही शिकार केल्याचा आरोप लावण्यात आलाय. 

ही शिकार करताना सलमानच्या शस्त्राचा परवाना संपल्यानं त्याच्यावर आर्म्स अॅक्टनुसारही खटला चालवण्यात येतोय. या प्रकरणी सलमानचा जोधपूर कोर्टात जबाब नोंदवण्यात आला असून पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.