सलमानचा लवकरच होणार 'मामा'!

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक खुशखबरी आहे. 

Updated: Sep 22, 2015, 03:50 PM IST
सलमानचा लवकरच होणार 'मामा'! title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक खुशखबरी आहे. 

सलमानची नुकतंच लग्न झालेली छोटी बहिण अर्पिता खान - शर्मा ही लवकरच सलमानला 'मामा' बनवणार आहे. अर्पिता गर्भवती आहे आणि लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.  

खुद्द सलीम खान म्हणजेच होणाऱ्या आजोबांनीही या बातमीला दुजोरा दिलाय. अर्पिता लवकरच आई होणार आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

सलमानच्या घरी गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये नुकताच गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी, अर्पिताही तिचा पती आयुष शर्मासोबत इथं उपस्थित होती. 

अर्पिता 2016 च्या सुरुवातीलाच आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याचं सांगितलं जातंय. अर्पिता आणि आयुष शर्मा यांचा विवाह नोव्हेंबर 2014 मध्ये झाला होता. हैदराबादमध्ये झालेल्या या भव्य लग्नसमारंभात अनेक नामी व्यक्ती उपस्थित होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.