भंसाळींनी लावली 'इतिहासाची वाट'

 निर्माता दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटामुळे उठलेला वादाचा पिंगा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये

Updated: Dec 4, 2015, 08:41 PM IST
भंसाळींनी लावली 'इतिहासाची वाट' title=

मुंबई : निर्माता दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटामुळे उठलेला वादाचा पिंगा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये...काशीबाई आणि मस्तानीला 'पिंगा'वर नाचवल्यानंतर आता भंसाळी यांनी बाजीरावांना 'मल्हारी'गाण्यावर नाचवत फुल ऑन दंगा घातलाये बघुया यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट

निर्माता दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटामुळे उठलेला वादाचा पिंगा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये...काशीबाई आणि मस्तानीला 'पिंगा'वर नाचवल्यानंतर आता भंसाळी यांनी बाजीरावांना 'मल्हारी'गाण्यावर नाचवत फुल ऑन दंगा घातलाये..

या फिल्मी बाजीरावाचे हावभाव पाहण्यासारखे आहेत..कदाचित आपण वीरपुरूष अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवा यांची भूमिका साकारतो आहोत याचे भान रणवीरला आहे की नाही असा प्रश्न पडावा...तसेच या गाण्यात लिहिलेल्या वाट लावली, रपारप, अतरंगी, चटकमटक या शब्दांवर महाराष्ट्रातील संगीतप्रेमींनी आक्षेप घेतलाये..गाण्याचे लेखन मराठमोळ्या प्रशांत इंगोलेने केले असून सिच्युएशननुसार आपण गाणी लिहिल्याचं प्रशांतचं म्हणण आहे...

निजामासोबतचे युध्द जिंकल्यानंतरचा जल्लोष साजरा करणारे 'मल्हारी' हे गाणं  बाजीराव बनलेल्या रणवीरसिंग वर चित्रीत करण्यात आलेले आहे...बाजीराव पेशव्यांच्या तोंडी असे 'वाह्यात'शब्द घातल्याने सध्या सोशल मीडियावरुन गीतकाराला धारेवर धरण्यात आले आहे..सोशल मिडीयावर भंसाळींवरही मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली असून भंसाळींचे डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल उपस्थित केला जातोय..

बाजीराव-मस्तानी हा भन्साळींचा स्वप्नव्त प्रोजेक्ट असून सिनेमाचं बजेट तब्बल 125 कोटींचं बजेट आहे..मात्र सिनेमा भोवतालचे वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही....भन्साळींचा बाजीरावचा हा दंगा मराठी प्रेक्षकांना रुचला नसून भन्साळींनी इतिहासीची अशा पध्दतीने अवहेलना करु नये असे जाणकारांचे म्हणणे आहे....त्यामुळे सतत वादाच्या भोव-यात अडकलेला हा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती मजल मारतो हे बघणे उत्सुकतेचं ठरणार आहे..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.