चूक झाली असेल तर सरळ माफी मागावी - अरबाज खान

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय चालू आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाहीये. 

Updated: Feb 21, 2016, 12:40 PM IST
चूक झाली असेल तर सरळ माफी मागावी - अरबाज खान

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय चालू आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाहीये. काही दिवसांपूर्वीच हे दोघे विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता अरबाज आपला संसार मोडू न देण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जातेय.  

त्याने ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट टाकली होती ज्यात 'माफी मागितल्याने कोणी लहान किंवा मोठा होत नसतो. तुमच्याकडून चूक झाली असेल तर सरळ माफी मागावी, त्यातच भलं असतं.' असं म्हटलं होतं. 

पण, या सर्वाचा मलायकावर काही परिणाम होताना जाणवत नाहीये. सध्या ती परदेशात सुट्टी एंजॉय करतेय. मलाईका आणि अर्जुन कपूर यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. खान कुटुंबानेही मलायकाला नीट वागण्याची ताकीद दिली होती.

पण, अरबाजच्या ट्विटर पोस्टवरुन तर तो आणि खान कुटुंबीय तिला एका 'सॉरी'च्या बदल्यात माफ करण्यास तयार असल्याचं दिसतंय.
देहविक्री व्यवसायात ४३ बांगलादेशींना अटक