इंटरनेटवर सोनाक्षी सिन्हाला सर्च करत असाल तर सावधान

आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींबाबत माहिती घेण्यासाठी बहुतेक जण गुगलची मदत घेतात.

Updated: Oct 13, 2016, 08:56 PM IST
इंटरनेटवर सोनाक्षी सिन्हाला सर्च करत असाल तर सावधान

मुंबई : आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींबाबत माहिती घेण्यासाठी बहुतेक जण गुगलची मदत घेतात. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंटेल सिक्यूरीटीच्या कंपनीच्या मॅकअॅफे व्हायरस प्रोटेक्शननं केलेल्या सर्व्हेनुसार सोनाक्षी सिन्हा ही तुमच्या कॉम्प्यूटरसाठी सर्वाधिक धोकादायक आहे.

याबाबत मॅकअॅफीनं एक यादीच प्रसिद्ध केली आहे. 11.11% टक्क्यांसह सोनाक्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर फरहान अख्तर 9.56% टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सेलिब्रिटींबाबत तुम्ही सर्च केलंत तर कॉम्प्यूटरमध्ये व्हायरस जाण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं या सर्व्हेत सांगण्यात आलं आहे.

मॅकअॅफीनं दिलेल्या या यादीमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि हृतिक रोशन यांचा समावेश नाही.

हे सेलिब्रिटी पसरवत आहेत व्हायरस

सोनाक्षी सिन्हा - 11.11%

फरहान अख्तर - 9.56%

करीना कपूर - 8.67%

टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर - 8.44%

श्रद्धा कपूर - 8.11%

क्रिती सॅनोन - 7.67%

प्रियांका चोप्रा आणि शाहीद कपूर - 7.56%

बिपाशा बासू - 7.22%

सैफअली खान - 7.11%

आलिया भट - 7%