आलियाने उघड केले 'शानदार'च्या बिकीनी शूटचे सिक्रेट

अभिनेत्री आलिया भटने 'शानदार' या आगामी चित्रपटातील बिकीनी शूटचं सिक्रेट उघड केलं आहे. या बिकिनी शूटसाठी तीने खूप मेहनत घेतली आहे. शेपमध्ये येण्यासाठी चित्रपट शूटिंगवेळी खूप सायकलिंग केल्याचं तिने पहिल्यांदा उघड केलं आहे. 

Updated: Oct 14, 2015, 10:24 AM IST
आलियाने उघड केले 'शानदार'च्या बिकीनी शूटचे सिक्रेट title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भटने 'शानदार' या आगामी चित्रपटातील बिकीनी शूटचं सिक्रेट उघड केलं आहे. या बिकिनी शूटसाठी तीने खूप मेहनत घेतली आहे. शेपमध्ये येण्यासाठी चित्रपट शूटिंगवेळी खूप सायकलिंग केल्याचं तिने पहिल्यांदा उघड केलं आहे. 

चित्रपटाच्या शुटिंगचं लोकेशन खूपच सुंदर होतं. त्यामुळे मी सायकलिंग करत होती. त्यामुळे बिकीनीमध्ये शूटिंग करण्यासाठी याची खूप मदत झाल्याचं आलियाने सांगितले. आमचं शुटिंग असो वा नसो मी, शाहिद  आणि इशान (शाहिदचा भाऊ) त्या फ्रेश वातावरणात व्यायाम करण्याचे सोडले नाही, असे आलियाने सांगितले. 

या लोकेशनच्या फ्रेश हवेमुळे मी जास्त जास्त जॉगिंग केले. त्यामुळे मला बिकीनी शूटसाठी खूप सहज शक्य झाले. मुंबईत ओपन प्लेसेस आणि फ्रेश एअर आपल्या मिळत नाही. त्यामुळे हा खूप चांगला अनुभव होता, असेही तिने सांगितले. 

'शानदार' हा चित्रपट विकास बहलने दिग्दर्शीत केला असून फॅन्टम फिल्म आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली हा चित्रपट २२ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. 

पाहा शानदारचा ट्रेलर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.