छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 

Updated: Nov 21, 2016, 05:12 PM IST
छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 

दिग्दर्शक करन जोहर फेम 'कॉफी विथ करन' या लोकप्रिय कार्यक्रमात शाहिद-मीरा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. 

डिसेंबर महिन्यात हा भाग प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या जोडीनंतर आत्तापर्यंत लोकांसमोर न आलेली जोडी म्हणजे शाहिद - मीरा... साहजिकच आपल्या कार्यक्रमातलं वेगळेपण म्हणून करननं या जोडीला पडद्यावर आणायचं ठरवलंय. 

शाहिद यापूर्वीही 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमात वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत आलाय... मीरा मात्र पहिल्यांदाच कुठल्या तरी टीव्ही शोमध्ये दिसणार आहे.