शाहिद कपूर लवकरच बाबा होणार?

शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.

Updated: Feb 19, 2016, 07:44 PM IST
शाहिद कपूर लवकरच बाबा होणार? title=

मुंबई : शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.

शाहिद आणि मीराचं जुलै महिन्यात लग्न झालं होतं. दिल्लीतील एका फार्म हाऊसमध्ये ७ जुलै २०१५ रोजी हे लग्न झालं होतं, हा एक खासगी समारोह होता.

कपूर आणि राजपूत परिवारासोबत काही निवडक पाहुणे या लग्नाला उपस्थित होते. नंतर कपूर परिवाराने १२ जुलै रोजी मुंबईत एक रिसेप्शन दिलं होतं, ज्यात अमिताभ बच्चनसह बॉलीवूड स्टार्स सामिल झाले होते.