शाहरुखला सगळ्यात मोठा धक्का. 'असहिष्णुता' भोवली ?

असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. 

Updated: Feb 6, 2016, 11:14 PM IST
शाहरुखला सगळ्यात मोठा धक्का. 'असहिष्णुता' भोवली ? title=

मुंबई: असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. त्यातच भर म्हणून की काय शाहरुखला आणखी एक धक्का बसला आहे. 

शाहरुखचा चित्रपट दिलवाले बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. त्यामुळे शाहरुखनं दिलवालेमुळे डिस्ट्रीब्युटर्सच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिली आहे. शाहरुखनं डिस्ट्रीब्युटर्सना 50 टक्के नुकसान भरपाई दिली आहे. अशी नुकसान भरपाई देणारा शाहरुख पहिलाच अभिनेता आहे.

 

'दिलवाले'तून शाहरुख आणि काजोलच्या जोडीनं कमबॅक केल्यामुळे चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण शाहरुख खाननं असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दिलवालेला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. काही ठिकाणी दिलवालेचे शो ही बंद पाडण्यात आले. याचा परिणाम दिलवालेच्या कमाईवरही झाला.