शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

एस्सेल व्हिजन सर्वांसाठी प्रसिद्ध संगीत नाटक 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाच्या रूपात घेऊन येत आहेत. अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गायक शंकर महादेवन पंडित जितेंद्र अभिषेकींनी अजरामर केलेल्या पंडितजींच्या भूमिकेत आहेत. 

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 2, 2015, 12:15 PM IST
शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

मुंबई: एस्सेल व्हिजन सर्वांसाठी प्रसिद्ध संगीत नाटक 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाच्या रूपात घेऊन येत आहेत. अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गायक शंकर महादेवन पंडित जितेंद्र अभिषेकींनी अजरामर केलेल्या पंडितजींच्या भूमिकेत आहेत. 

आणखी वाचा - व्हिडिओ: शंकर महादेवन अभिनेत्याच्या भूमिकेत पहिल्यांदाच

नुकतंच चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालंय. 'सूर निरागस हो' या गाण्यात शंकर महादेवन म्हणजेच पंडितजी गणपती बाप्पाची आराधना करत आहेत.

हे गाणं यूट्यूबवर चांगलंच हिट होतंय. अवघं बॉलिवूड या गाण्याच्या प्रेमात पडलं असून खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही हे गाणं आपल्या टि्वटरवरून शेअर केलंय. 

 

बिग बींसोबत सोनू निगम, विशाल ददलानीपासून झाकीर हुसैनपर्यंत अनेकांनी हे गाणं शेअर केलंय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.