मुंबई : अजय देवगनच्या 'शिवाय'या महत्त्वाकांक्षी सिनेमाने आतापर्यंत तब्बल ६७ कोटींची घसघशीत कमाई केलीये..सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विशेष सुरुवात झाली नव्हती..
वीकेडपर्यंत या सिनेमाने ३० कोटींची कमाई केली होती..मात्र सोमवारी आणि मंगळवारी या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये जबरदस्त वाढ झालीये..
या सिनेमाने सोमवारी १८ आणि मंगळवारी १९ कोटींची कमाई करत १०० कोटींच्या दीशेने वाटचाल सुरु केलीये..सिनेमाचं दिग्दर्शनही अजय देवगननेच केलं असून सिनेमाला समीक्षकांसह रसिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळताये..
सिनेमातील एक्शनसीन्सचं मात्र सर्वत्र कौतुक होतयं