'सेक्स स्कँडल' प्रकरणात श्वेताला हायकोर्टाकडून क्लीन चीट

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिला सेक्स स्कॅन्डल प्रकरणात हैदराबाद हायकोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय. श्वेता आणि तिच्या कुटुंबीयांसाठी ही खूपच दिलासादायक बातमी आहे.

Updated: Dec 6, 2014, 05:42 PM IST
'सेक्स स्कँडल' प्रकरणात श्वेताला हायकोर्टाकडून क्लीन चीट title=

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिला सेक्स स्कॅन्डल प्रकरणात हैदराबाद हायकोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय. श्वेता आणि तिच्या कुटुंबीयांसाठी ही खूपच दिलासादायक बातमी आहे.

काही महिन्यांपूर्वी हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये तथाकथित सेक्स स्कँन्डल प्रकरणात श्वेता बसू हिला अटक करण्यात आली होती. दोन महिने सुधारगृहात काढल्यानंतर श्वेता बाहेर पडली. आपला कोणत्याही सेक्स स्कँन्डल प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं यानंतर श्वेतानं म्हटलं होतं. पोलिसांचा गैरसमज झाल्यानं त्यांनी आपल्याला अटक केल्याचं स्पष्टीकरण यावेळी श्वेतानं दिलं होतं. 

क्लीन चिट मिळाल्यानंतर श्वेतानं 'ही आपल्या कुटुंबीयांसाठी खूप मोठी बातमी आहे... मी अनेक दिवसानंतर त्यांना हसताना पाहिलंय' अशी प्रतिक्रिया दिलीय. आपल्याला पूर्ण खात्री होती आणि मला या बातमीची प्रतिक्षा होती. माझ्यावर शंका असलेल्या अनेक डोळ्यांना आता उत्तर मिळालं असेल, असंही श्वेतानं म्हटलंय.  

श्वेताचं नाव सेक्स स्कँन्डल प्रकरणात आल्यानंतर सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक जणांनी श्वेताला समोरून पाठिंबा दर्शवला होता. हंसल मेहता आणि विशाल भारद्वाज यांसारख्या सिनेनिर्मात्यांनीही तिला सिनेमांची ऑफर दिली होती. 

सध्या श्वेता, अनुराग कश्यप, विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट कन्सल्टंट म्हणून नोकरी करतेय. 

या प्रकरणामुळे, आपण मोडून पडलेलो नाही तर आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळालाय, असं श्वेता म्हणतेय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.